पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. पांढरा कांदा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.
पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. पांढरा कांदा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.
पांढऱ्या कांद्याचे फायदे नेमके कोणते ते जाणून घ्या. लाल कांद्याप्रमाणेच पांढरा कांदाही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पांढऱ्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी6, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, फायबर, प्रोटीन, फोलेट इत्यादी पोषक घटक आढळतात.
पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. पांढऱ्या कांद्यामध्ये प्रीबायोटिक देखील आढळते, जे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते.
पांढरा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
पांढरा कांदा केसांशी संबंधित समस्यांपासून देखील दूर करतो. यामुळे कोंडा तर दूर होईल आणि केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.
जर तुम्हाला केसांत कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही पांढऱ्या कांद्याचा रस लावू शकता.
पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने हा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पांढऱ्या कांद्यामध्ये क्वेर्सेटिन आणि अँथोसायनिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
यामुळेच पांढरा कांदा खाल्ल्याने कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून देखील बचाव होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.