तेल आणि सिरम या दोघांमध्ये बराच फरक आहे. तेल हे केसाच्या मूळांना लावले जाते. केसाला पोषण देण्याचे काम तेल करते. तर सीरम हे केसाला लावले जाते. सिरम हे केसाचे धूळ आणि प्रदूषणापासून रक्षण करते. सिरम लावल्याने केस चमकदार देखील होतात. पण केस जर मजबूत ठेवायचे असतील तर केसाला तेल लावणे आवश्यक आहे. केसाला स्मूथ ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा केसाला सिरम लावणे फायदेशीर ठरु शकते. याशिवाय हेअरस्टाईल करण्याआधी केसाला सिरम लावणे आवश्यक आहे. त्यामुळे हे दोन्ही वेगळे असून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा.