अनेक महिला या त्यांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लिपस्टिकचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं. पण हीच लिपस्टिक अनेक समस्यांचं कारण देखील ठरु शकते. लिपस्टिकमध्ये बिस्मथ ऑक्सीक्लोराईड नावाचं एक रसायन असतं. ज्यामुळे कर्करोगाची शक्यता असते. याशिवाय लिपस्टिकमध्ये काही धोकादायक घटक देखील असतात. त्यामुळे ओठांच्या जवळ खाज निर्माण होऊ शकते. लिपस्टिकचा वारंवार वापर केल्याने हा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे उच्च रक्कदाबाचा देखील त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. हृदयाच्या संबंधीचे आजार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे लिपस्टिकचा वापर हा जपून करण्याचा सल्ला दिला जातो.