झोपेत स्वप्न पडणं साहजिक आहे
प्रत्येकाला काही ना काही स्वप्न पडतात
झोपेत आपण बराच काळ कल्पनेच्या दुनियेत असतो
माणसाच्या मानसिक आणि आरोग्यासाठी स्वप्न पडणं फार गरजेचं आहे
आपण दिवसभर जो काही विचार करतो किंवा दैनंदिन जीवनात आपल्या निगडीत गोष्टी घडतात
त्याच निगडीत आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक स्वप्न पडतात
काही वेळा तर आपल्याला अशी स्वप्न पडतात ज्याचा तर्क आपल्याला दिवसभर विचार करून सुध्दा लागत नाही
काही लोकांचा असा अंदाज आहे की स्वप्नात पडलेल्या गोष्टीचा अंदाज पुढे भविष्यावर आधारित असतो
गंमत म्हणजे फक्त माणसाला स्वप्न नाही पडत प्राणी देखील आपल्या दुनियेत जगत असतात त्यांना सुध्दा स्वप्न पडतात