तुमचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये तुमचे राहणीमान, याची महत्त्वाची भूमिका असते. टाप-टीप दिसण्याने तुमचा आत्मविश्वास कैकपटीने वाढतो.



यामध्ये तुमचे कपडे, हेअरस्टाईल, शूज आणि तुमच्या हातात घातलेले घड्याळ असा सर्व मिळून तुमचा लूकमधून तुमचा आत्मविश्वास दिसून येतो.



मनगटावरील घड्याळाचा वापर वेळ पाहण्यासाठी तर होतो, पण त्यामुळे तुमच्या लूकमध्ये एक प्लस पॉईंट वाढतो.



मनगटावरील घड्याळाबाबत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काही लोक डाव्या हाताच्या मनगटावर तर काही लोक डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ बांधतात.



लोक त्यांच्या सोयीनुसार उजव्या किंवा डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ बांधतात. पण बहुतेक लोक घड्याळ डाव्या हातात घालतात. यामागचं कारण जाणून घ्या.



बरेच लोक उजव्या हाताने महत्त्वाची कामे करतात. बरीचशी कामे सरळ हाताने केल्यामुळे उजवा हात बहुतेक वेळा व्यस्त राहतो.



अशा परिस्थितीत उजव्या मनगटावरला घड्याळ बांधल्यास वेळ पाहण्यात अडचण येते आणि कामात अडथळा येतो.



त्या उलट, डाव्या मनगटावर घड्याळ बांधल्यास पुन्हा पुन्हा वेळ पाहण्यात फारसा त्रास होत नाही. तुम्ही तुमच्या उजव्या हातातील काम कायम ठेवत दुसऱ्या हातावरील घड्याळामध्ये वेळ पाहू शकता.



सर्व लोक डाव्या मनगटावरलाच घड्याळ बांधतात असे नाही. उजव्या हातातही घड्याळ घालणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील.



यातील बहुतेक लोक असे आहेत, जे डावा हाताने काम करणारे डावखुरे असतात. घड्याळ कोणत्या हातात घालावे हा प्रत्येकाच्या सवडीचा विषय आहे.



कुणाला डाव्या हातात घड्याळ बांधणे सवडीचं वाटत तर काहींना उजव्या हातात घड्याळ घालणे सोयीस्कर वाटते. हे प्रत्येकाच्या कम्फर्ट लेव्हलवरही अवलंबून असते.