द्राक्षे आरोग्यासाठी चांगली असतात. द्राक्षांमध्ये पोषक तत्वे आहेत. काळी द्राक्षं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते असे काही संशोधनात आढळून आले आहे. ह्रदयविकार, कोलेस्ट्रॉलचा त्रास अथवा रक्तदाबाची समस्या असेल अशा लोकांनी नियमित काळी द्राक्षे खाल्ल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. द्राक्षांमधील पोषक घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दृष्टी सुधारण्यासाठी द्राक्षांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, बीटा कॅरेटीन सारखे अॅंटि ऑक्सडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे फ्री रेडिकल्समुळे होणारे शरीरातील पेशींचे नुकसान कमी होते आणि कर्करोगाला दूर ठेवता येते. ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो अशा लोकांनी नियमित काळी द्राक्षे खाल्ल्यास त्यांना चांगला आराम मिळू शकतो. नियमित द्राक्षे खाण्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. काळी द्राक्ष खाण्यामुळे शरिरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींसाठी द्राक्षे फायदेशीर आहेत. काळ्या द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी, के आणि ए मोठ्या प्रमाणावर असतं. फ्लेवॉनॉईड, मिनरल्सचे प्रमाणही भरपूर असते. या पोषक घटकांमुळे काळी द्राक्ष खाण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. फळांचे सेवन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे. ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही