सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यावं का हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. सकाळी रिकाम्या पोटी दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्हाला प्रोटीन आणि ताकद मिळण्यास मदत होते. दूध पचण्यासाठी बराच वेळ लागतो. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे लहान मुलांना सकाळी दूध प्यायला दिले जाते. त्यांची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. तसेच दूधामुळे हाडं मजबूत होण्यास देखील मदत होते. तर मेंदू देखील तल्ल्ख होण्यास मदत होते. पण वृद्धांची पचनसंस्था ही हलकी असते त्यामुळे त्यांनी रिकाम्या पोटी दूध पिणं टाळावं.