रताळं खाल्ल्याने अनेक पोषण तत्त्वे शरीराला मिळण्यास मदत होते. यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. मधूमेहासाठी रताळं खाणं फायदेशीर ठरु शकतं. तसेच कर्करोगासाठी देखील रताळे फायदेशीर ठरु शकतं. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रताळ्यांची मदत होऊ शकते. हृदयासाठी देखील रताळे फायदेशीर ठरु शकते. दम्याच्या आजारासाठी रताळं खाण्याचा सल्ला दिला जातो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी रताळं मदत करु शकते. वजन कमी करण्यासाठी रताळे फायदेशीर ठरु शकते. डोळ्यांसाठी देखील रताळे उपयुक्त ठरु शकते.