चांदबिबीचा जन्म १५५० साली झाला होता. ती विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती.

चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते.



चांदबिबी ही अहमदनगराचा निजामशाह पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुऱ्हाण-उल मुल्काची बहीण होती.



तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की इंग्रजी भाषा येत होत्या.



चांदबिबीचा विवाह विजापुराचा पहिला अली आदिलशाह याच्याशी झाला.



इ.स. १५९६ ते इ.स. १५९९ या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले.



निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरावर चाल केली.



कालांतराने चांदबिबीची मोगलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मोगलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला.



१५९९ मध्ये सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबिबीची हत्या केली.



तिच्या मृत्यूनंतर चारच महिन्यांमध्ये मोगलांनी अहमदनगराचा पाडाव केला.



Thanks for Reading. UP NEXT

पाकिस्तान मध्ये मर्सिडीज मिळते का ?

View next story