ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारा एक पहिला तरुण जो तमाम तरुणांचा फेव्हरेट आहे.



त्याचं राजकीय नेतृत्व, त्याची स्टाईल, पर्यावरण प्रियता सर्वाना प्रीत आहेच, अश्यातच आदित्य यांनी लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या क्लीन शेव्हने!



पत्रकारांनी त्यांनी केलेल्या चकचकीत दाढीबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी दिलेल्या हजरजबाबी मिश्किल उत्तराने एकाच हशा पिकला,म्हणाले 'दाढी बदलायला पाहिजे' क्लीन शेव्ह करत त्यांनी एकंदरीत मुख्यमंत्र्यांना टोलाच लागवल्याचं पाहायला मिळालं.



राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.



आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत.



आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.



२३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.



आदित्य ठाकरे यांनी कायद्यामध्ये पदवी घेतली आहे.



2010ला युवासेनेची स्थापना करण्यात आली.



आदित्य ठाकरे मुंबईतल्या नाईट लाईफ आणि रुफटॉप संकल्पनेचा पुरस्कर्ता आहेत.