उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 97.6 अब्ज डॉलर झाली आहे. गौतम अदानी अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. गुरुवारपर्यंत अदानी या यादीत 14 व्या क्रमांकावर होते. त्याच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 7.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत