ओरहान अवत्रामणी, ज्याला 'ओरी' म्हणूनही (Orhan Awatramani, also known as 'Orry') ओळखले जाते. अलीकडे, Jio World Plaza लाँच करताना नीता अंबानी, दीपिका पदुकोण आणि शुभमन गिल यांच्यासोबत त्याचे फोटो व्हायरल झाले होते. ओरहान बॉलीवूडचा BFF (Bollywood's BFF) म्हणूनही ओळखला जातो. तो अलीकडे त्याच्या बोल्ड फॅशन निवडी आणि फॅन फॉलोइंगसाठी चर्चेत आहे. ओरहानच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो मुंबईतील सामाजिक कार्यकर्ता आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चेअरपर्सन ऑफिसमध्ये विशेष प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याने न्यूयॉर्कच्या पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइनमधून ललित कला आणि कम्युनिकेशन डिझाइनमध्ये बॅचलर केलं आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या बायोमध्ये कठोर परिश्रम प्रतिभेला हरवतं, जेव्हा प्रतिभा कठोर परिश्रम करत नाही. म्हटले आहे. तो अनेकदा मूव्ही प्रीमियर, फोटोशूट इत्यादींचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो.