त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्योत देबबर्मा यांच्याकडे राज्यात किंगमेकर म्हणून पाहिलं जात आहे.
भारताच्या पूर्वेकडील राज्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (2 मार्च) थोड्याच वेळात हाती येणार आहे
या विधानसभा निवडणुकीत सध्या त्रिपुरा निवडणुकीत राजघराण्याची जोरदार चर्चा आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांच्या टिपरा मोथ पक्षाने 42 उमेदवारांसह निवडणूक लढवली.
देबबर्मा यांनी 'टिप्ररालँड'ची मागणी केली आहे. त्रिपुरातील टिपरा मोथा या आदिवासी भागात देबबर्मा यांचा पक्ष मजबूत मानला जातो.
राजघराण्यातील प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा हे टिपरा मोथा पक्षाचे अध्यक्ष आहेत.
प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांचा जन्म 4 जुलै 1978 रोजी त्रिपुराच्या राजघराण्यात झाला.
प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांचे वडील किरीट बिक्रम किशोर देबबर्मा आणि आई बिभू कुमारी देवी.
प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांचे बालपण दिल्लीत गेले. सध्या ते आगरतळा येथे वास्तव्यास राहतात.
मात्र, ते या पदावर जास्त काळ राहू शकले नाहीत. NRC प्रकरणामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
देबबर्मा कुटुंबाचे राजकारणाशी जुनं नातं आहे.
प्रद्योत देबबर्मा यांचे वडील किरीट बिक्रम यांनी दीर्घकाळ काँग्रेसमधून राजकारणात सक्रिय होते.
प्रद्योत देबबर्मा यांचे वडील किरीट बिक्रम तीन वेळा खासदार होते.