यंदा नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली. मात्र फेब्रुवारी महिना उजाडताच तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना अर्धा संपला असून तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
घराबाहेर पडलं की, घामाच्या धाराचं लागतात. फेब्रुवारी महिन्यात जाणवणारी गरमी उन्हाळ्याची चाहूल असल्याचं म्हटलं जात आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात झालेली वाढ पाहता यंदाचा उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा मारा सहन करावा लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारी महिना सरत आला असून तापमानात वाढ झालेली पाहायली मिळत आहे.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा आणि कर्नाटकात तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे.
सध्या या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी 35 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान फारसं कमी होणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये तापमान 28-33 अंशांवर पोहोचलं आहे, हे तापमान सामान्य स्थितीपेक्षा पाच ते नऊ अंशांनी जास्त आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. काही भागांत अगदी मे महिन्याप्रमाणे उन्हाच्या झळा बसत आहेत.
कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स नसल्यामुळे म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने आणि डोंगरावर कमी हिमवृष्टी झाल्यामुळे मैदानी भागात उष्णता वाढत आहे.