दक्षिण आफ्रिकेतून भारतात 12 चित्ते पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी रवाना झालेले चित्तेत आज (18 फेब्रुवारी) मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर दाखल झाले आहेत.
तेथून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाच्या C17 विमानामधून 12 चित्ते भारतात पोहोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून 'प्रोजेक्ट चित्ता' मिशन राबवलं जात आहे. या अंतर्गत भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात आणले जात आहेत.
यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ते परतले आहेत.
आता पुन्हा एकदा 12 चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. या 12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत.
या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. हवाई दलाचं विमान चित्त्यांना घेऊन सकाळी 10 वाजता भारतात मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर उतरलं.
त्यानंतर चित्यांना हेलिरॉप्टरद्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं आहे. आता मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते चित्ते सोडण्यात आलं आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते चित्ते कुनो पार्कमध्ये सोडण्यात आले होते.
त्यानंतर आज आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात दाखल झाले आहेत. यामुळे आता कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 चित्ते आहेत.