'बिग बॉस ओटीटी'चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.



ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.



एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नोएडा आणि एनसीआरमध्ये विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.



याच कारणाने नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विशसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो.



विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे.



पोलिसांनी सांगितले की, एका माहितीदाराने एल्विशसोबत संपर्क साधला असता त्याने एजंट राहुलचा नंबर दिला होता.



त्यानंकर माहिती देणाऱ्याने राहुलला पार्टी आयोजित करण्यास त्याने सांगितले.



या पार्टीमध्येच पोलिसांनी छापा टाकून पाच आरोपींना अटक केली आहे.