दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी लग्नबंधनात अडकले आहेत. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. वरुण आणि लावण्याने दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं आहे. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वरुणने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वरुण आणि लावण्याच्या फोटोवर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वरुण आणि लावण्याचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. लग्नसोहळ्यादरम्यान वरुण आणि लावण्या आनंदी होते. लग्नसोहळ्यातील फोटोंमध्ये वरुण आणि लावण्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. वरुण आणि लावण्याच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.