बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून रणबीर कपूरला सगळेच जण ओळखतात. दरम्यान रणबीर हल्ली बऱ्याच चर्चांमध्ये असतो. रणबीर कपूर हा त्याचा अॅनिमल या चित्रपटासाठी विशेष चर्चेत राहिला. रणबीरचा हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की रणबीर कपूर सोशल मीडियावर नाही. रणबीरने नुकताच याबाबत खुलासा करणार आहे. एका मुलाखतीमध्ये रणबीरने याबाबत भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, मी खूप बोरिंग पर्सनॅलिटी आहे. त्याचं म्हणणं आहे की, सोशल मीडियावर लोकं एंटरटेनमेंटसाठी वापर करतात आणि मला ते अधिकचं काम करायला आवडत नाही.