बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लग्नानंतर तिचा जास्तीत-जास्त वेळ अमेरिकेत घालवत आहे. प्रियांकाने तिच्या टॅलेंटमुळे बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला आहे. आज प्रियांका आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. प्रियांका चोप्राची इंडस्ट्रीत तिच्या भारतीय चाहत्यांना नक्कीच उणीव भासते. परंतु, प्रियांका चाहत्यांना निराश न करता नेहमीच त्यांच्याशी कनेटक्ट असते. प्रियांका परदेशात राहूनही तिची देशी परंपरा जपत आहे. प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट असते. प्रियांका इन्स्टाग्रामवर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलिकडेच तिने व्हिडीओ शेअर केला असून तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा एका रेस्टॉरंटमध्ये जेवणात मग्न आहे. या व्हिडीओवर प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला वाटते की जेवल्यानंतर थोडी हलचाल केल्यामुळे पोटात आणखी जागा निर्माण होते'.