अनिता दातेचा 'मी वसंतराव' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 'मी वसंतराव' सिनेमावर भाष्य करणारी अनिता दातेची पोस्ट सध्या चर्चेत आहे. 'मी वसंतराव' सिनेमात अनिताने पंडित वसंतराव देशपांडे यांच्या कणखर आईची व्यक्तीरेखा साकारली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या माध्यमातून अनिता दाते घराघरांत पोहोचली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही भूमिका साकारली होती. अनिता दाते छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनिताने 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'मी वसंतराव' या सिनेमाचे दिग्दर्शन निपुन धर्माधिकारीने केले आहे.