उपवास म्हटल की अनेकांना चहा लागतोच.

चहाने भूक मारते असे आपण अनेकदा ऐकले आहे.

पण तुम्हला माहितीये का? असे काही पदार्थ आहेत जे उपवासाला खाऊ नये.

जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ.

उपवासाच्या दिवशी संत्रे, लिंबू, मोसंबी यासारखी आंबट फळे खाणे टाळावे.

कारण या फळांमुळे ऍसिडिटी समस्या उद्भवू शकते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की उपवासाच्या वेळी नेमकं खायचं काय?

तुम्ही उपवासाच्या वेळी ताजी फळे, उकडलेले बटाटे, रताळी, खाऊ शकतात.

तसेच सरबत, फळांचे ज्यूस यांचे सेवन करू शकता.

त्याच बरोबर जास्त तिखट नसलेली साधी साबुदाण्याची खिचडी ही खाऊ शकता.