थंडीच्या दिवसात बाजारात आवर्जून दिसणारा रानमेवा म्हणजे बोर लहानापासून मोठ्यांपार्यंत सर्वांनाच बोर खायला आवडते. अनेक बोर खाण्याचे फायदे माहितीच नसतात. थंडीच्या दिवसात बोराचे सेवन आवर्जून करायला हवे. बोराचे सेवन केल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच बोराचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. बोरामध्ये व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते. बोराचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. बोराचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. थंडीच्या दिवसात बोराचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.