हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवस्थानी मानले जाते. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन असतेचं. शहरांमध्ये अनेकांकडे वृदावनं नसली, तरी तुळशीचं रोपटं मात्र असतंच. तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे, अनेक आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठीही वापर केला जातो. तुळशीमध्ये असलेले गुणधर्म पचनास मदत करतात. तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास होण्यास मदत होते. तुळशीयुक्त पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तुळशीला औषधी वनस्पती मानली जाते. तुळशीचे पाणी प्यायल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास देखील मदत होते. तुळशीचे पाणी पिल्याने श्वसनसंस्थेवर सुधारण्यास मदत होते.