कधी कधी प्रवाशांचे सामान चालू ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पडते. अशा परिस्थितीत तुम्ही हरवलेले सामान कसे शोधणार? जाणून घ्या. रेल्वेट्रॅकच्या बाजूला अनेक विद्युत खांब लावण्यात आले आहेत. त्यावर एक विशेष क्रमांकही लिहिला आहे. तुमचा फोन किंवा सामान पडल्यास, तुमच्या जवळील विद्युत खांबावरील नंबर तपासा. त्यानंतर आरपीएफ हेल्पलाईनवर कॉल करा. रेल्वे संरक्षण दलाचा अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 आहे. तुमचा फोन कोणत्या स्टेशनवर तसेच कोणत्या विद्युत खांबाजवळ पडला हे आरपीएफला सांगा. यानंतर आरपीएफ तुमचा फोन शोधण्यास मदत करेल. तुम्ही तुमचा फोन त्या स्टेशनवर जाऊन आरपीएफकडून घेऊ शकता.