वाहन चालवण्याचा परवाना गाडी चालवताना सगळ्यात महत्त्वाचा असतो. परवान्याशिवाय गाडी चालवता येत नाही. वयाची 'अठरा' वर्ष पूर्ण झाल्यावर आधी शिकाऊ परवाना किंवा लर्निंग लायसन्स आणि मग कायमचा परवाना मिळतो. परवाना सुरुवातीला 20 वर्षांसाठी असतो आणि त्यानंतर त्याचं 10-10 वर्षांनी नुतनीकरण करावं लागतं. वाहनाचे लायसन्स काढण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. लायसन्स हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. तुमच्याकडून अपघात झाला तर प्रशासनाचे लोक सर्वात आधी लायसन्स मागतात. मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार विना परवाना गाडी चालवल्यास 5000 रुपये आकारण्यात येतात. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड, फ्रान्स, युके, स्वित्झर्लंड आणि मलेशिया या देशात भारताचं लायसन्स स्वीकारलं जातं. त्यामुळे वाहन चालवताना लायसन्स बाळगणं अतिशय महत्त्वाचं असतं.