समुद्रात बनलेला भारतातील सर्वात मोठा पूल बनून तयार आहे.



या पूलाची लांबी २१.८ कि.मी पेक्षा जास्त आहे.



मुंबई ला नवी मुंबईशी जोडणाऱ्या ह्या ब्रिजला भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून अटल सेतू हे नाव देण्यात आले आहे.



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई येथे देशातील सर्वात मोठा ब्रिज अटल सेतू चे उद्घाटन करायला आले आहेत.



दक्षिण मुंबई ते नवी मुंबई चे अंतर पार करायला आता २० ते २५ मिनीटांचा वेळ लागणार आहे.



ह्या ब्रिज च्या उद्घाटनानंतर दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होणार आहे.



या ब्रिज वर ६ लेन आहेत, ब्रिज शिवडी ते न्हावाशेवा पर्यंत बनलेला आहे.



मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ने मुंबई ट्रांस-हार्बर लिंक बनवण्यासाठी ३ कन्स्ट्रक्शन कंपन्यांसोबत करार केला होता.



या ब्रिज ला बनवायला जवळपास १७७,९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५०४,२५३ मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.



या ब्रिज ला दोन ठिकाणी लिंक केले गेले आहे. पहिला एरोली-मुलुंड कनेक्टर तर दुसरा वाशी कनेक्टर आहे.