मुंबई ते नवी मुंबई ला जोडणारा देशातील सर्वात मोठा समुद्री पुल बनून तयार आहे.



मुंबई ट्रांस हार्बरचं उद्घाटन १२ जानेवारीला प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे.



या ट्रांस हार्बर लिंकमुळे काही तासांचं अंतर अवघ्या काही मिनिटांचं होणार आहे.



दक्षिण मुंबई ते नवी मुंबईचं २२ कि.मी. असलेले अंतर २० मिनिटांत पार होईल.



मुंबई ट्रांस हार्बरवर कार, टॅक्सी, हलकी वाहनं, मिनीबस यांच्यासाठी वेग मर्यादा १०० किमी. प्रति तास असेल.



पुल चढताना आणि उतरताना वाहनांची वेग मर्यादा ४० किमी. प्रति तास असणार आहे.



मुंबई ट्रांस हार्बर लिंकला बनवायला जवळपास २०,००० करोड रूपये इतका खर्च आहे.



या पुलावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस चे १९० सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत.



तसेच ६ डिस्प्ले देखील लावले गेले आहेत.



हा समुद्री पुल मुंबई - पुणे एक्सप्रेसवे, मुंबई - गोवा हायवे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडेल.