सिटिंग डिसीजचे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? दीर्घकाळ बसून राहिल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात सिटिंग डिसीज हा शब्द सामान्यतः मेटाबॉलिक सिंड्रोम आणि बैठी जीवनशैलीच्या दुष्परिणामांचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो जर तुम्ही अनेक तास सतत बसून राहिल्यास त्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो 10 तासांपेक्षा जास्त वेळ सतत काम केल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो सिटिंग डिसीज संबंधित आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी उभे राहणे आणि चालणे खूप महत्वाचे आहे. चालणे हा एक सौम्य व्यायाम आहे, जो प्रत्येकाला करणे सोपे आहे आपण रोज ज्या गतीने चालतो त्यामुळे मोठा फरक पडतो 30 मिनिटानंतर उभे राहिल्याने आणि वॉक केल्याने शरीरातील चयापचय गती सक्रिय होते कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करण्याचा प्रयत्न करा किंवा दररोज फास्ट चालण्याचा प्रयत्न करा चालण्यामुळे सिटिंग डिसीजचा धोका कमी होण्यास मदत होईल (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)