मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 'नो हाँकिंग' म्हणजे विनाकारण हॉर्न न वाजविणे तसेच विनाकारण हॉर्न वाजवू नये. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजच्या दिवशी जनजागृती केली जाणार आहे. वाहतूक पोलीस विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करणार आहेत. मुंबईत वाहनांची मोठी संख्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच ध्वनी प्रदुषण होते. शहराला या समस्येपासून मुक्त करण्यासाठीच ही मोहिम राबवली जात आहे. हॉर्नचा वापर टाळून वाहन चालकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या महिला, गर्भवती महिला, मुलं यांना या हॉर्नमुळे त्रास होतो. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 9 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी बुधवारी मुंबईत वाहतूक पोलिसांकडून नो हॉंकिंग डे पाळण्यात येणार आहे. वाहन चालवणं हा एक आनंद आहे. मात्र, कारणाशिवाय हॉर्न वाजवत राहिल्यास त्याचा इतरांना त्रास होतो. त्यामुळे याची काळजीही घेणं गरजेचं आहे.