केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याची पंचाहत्तार वर्ष साजरी करण्यात आली आहेत. त्याच अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम राबण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोस्टात देखील आता तिंरगा मिळणार आहे. यंदाच्या वर्षात भारत स्वातंत्र्याची शहात्तर वर्ष पूर्ण करणार आहे. म्हणूनच शहराच्या मुख्य पोस्टात 25 रुपयांत तिरंगा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच तुम्ही या तिरंग्यासाठी ऑनलाईन देखील बुकिंग करु शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. पोस्टात मिळणाऱ्या हा तिरंग्याचा लांबी 30 मीटर तर रुंदी 20 मीटर असणार आहे. त्यामुळे घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचं आवाहन पोस्टाकडून करण्यात येत आहे. शहरातील मुख्य पोस्टात तिरंग्याची विक्री सुरु देखील करण्यात आली आहे.