कोरोना महामारीतून अद्यापही सावरत आहे. यामुळे जगभरात लाखो रुग्णांनी प्राण गमावले आहेत. 500 वर्षापूर्वीही अशीच एक महामारी पसरली होती, ज्यामुळे शेकडो लोकांचा बळी गेला होता.
धक्कादायक बाब म्हणजे या महामारीमुळे नाचता-नाचता लोकांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण नेमकं काय आहे, हे सविस्तर जाणून घ्या.
1518 मध्ये, अल्सेसच्या स्ट्रासबर्गमध्ये अशीच एक महामारी पसरली होती, ज्याला आपण आता फ्रान्स म्हणून ओळखतो. 500 वर्षांपूर्वी आय डान्सच्या महामारीने फ्रान्समध्ये अनेकांचा बळी घेतला होता. या महामारीमुळे सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला.
जुलै 1518 मध्ये एका तरुणीने अचानक नाचायला सुरुवात केली आणि नाचत असताना तिचे भान हरपलं. तिला नाचताना पाहून लोकांना आश्चर्य वाटलं, कारण ती नाचताना कोणत्याही प्रकारचं गाणं किंवा संगीत सुरु नव्हतं.
आता फ्रान्समध्ये अनेक भागात लोक नाचू लागले. लोकांची नाचण्याची क्रिया थांबत नव्हती. यानंतर पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या घटनेमुळे 15 जणांचा मृत्यू झाला, तेव्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला डॉक्टरांना असे वाटले की, हा एक प्रकारचा नैसर्गिक आजार आहे.
शरीरातील रक्ताचे तापमान वाढल्यामुळे हे घडत आहे. काही डॉक्टरांनी याचे वेगवेगळे सिद्धांत मांडायला सुरुवात केली. पण यामागचं मूळ कारण सापडत नव्हतं.
आजही अनेक शास्त्रज्ञांमध्ये लोकांचा मृत्यू नाचण्यामुळे झाला की, नाही यावर मतभेद आहेत. या रहस्यमय घटनेला शास्त्रज्ञांनी 'डान्सिंग प्लेग' असं नाव दिलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, फ्रान्समध्ये त्यावेळी या विचित्र 'डान्सिंग प्लेग' आजारामुळे सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेचं गूढ आजतागायत कायम असून याच्या रहस्यावरून आजपर्यंत पडदा उचलला गेलेला नाही. अजूनही शास्त्रज्ञ त्या घटनेवर संशोधन करत आहेत.