प्रथिनांसाठी बहुतेक लोक सोया, चिकन, अंडी, दूध, चीज आणि नट्स यांचा आहाराचा भाग बनवतात, परंतु गेल्या काही वर्षांत व्हे प्रोटीन पावडरची मागणीही लक्षणीय वाढली आहे.



बॉडी बिल्डिंग करणारे आणि जिममध्ये जाणारे लोक व्हे प्रोटीनचा वापर करतात.



व्हे प्रोटीन हा एक प्रकारचा सप्लिमेंट आहे जो खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि नवीन स्नायू तयार होतात.



व्हे प्रोटीनचे नियमित सेवन केल्याने भूक कमी होते आणि लालसा टाळता येते. मात्र, प्रथिनांचे सेवन करण्यासोबतच नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे.



व्हे प्रोटीन इन्सुलिन सक्रिय करण्याचे काम करते आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.



व्हे प्रोटीनमध्ये मुबलक प्रमाणात अमिनो अॅसिड सिस्टीन असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.



हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हे प्रोटीनचे सेवन देखील केले जाऊ शकते. हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी व्हे प्रोटीन उपयुक्त मानले जाते.



हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हे प्रोटीनचे सेवन देखील केले जाऊ शकते. हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी व्हे प्रोटीन उपयुक्त मानले जाते.







व्हे प्रोटीनमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.