फार कमी लोकांना शिळी पोळी खायला आवडते. जर घरी रात्रीचे जेवण उरले असेल तर ते बहुतेकदा गाय किंवा इतर प्राण्यांना दिले जाते.



पण शिळी पोळी हा आरोग्याचा खजिना आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्याचे अनेक फायदे होऊ शकतात.



उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी सकाळी लवकर थंड दुधासोबत शिळी पोळी खाणे फायदेशीर ठरू शकते.



जर कोणाला मधुमेहाची तक्रार असेल आणि त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर अशा लोकांनी शिळ्या पोळीचे सेवन करावे.



शिळ्या पोळीमध्ये डायटरी फायबर आढळते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. हे एक फायबर आहे जे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते.



निरोगी बॅक्टेरिया पचनासाठी खूप महत्वाचे आहेत. शिळी पोळी खाल्ल्याने आतड्यात निरोगी बॅक्टेरिया वाढतात.



याच्या मदतीने गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.



न्याहारीमध्ये शिळी पोळी ठेवण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामुळे वेळेचीही बचत होते.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.