परदेशात जाण्याची अनेकांची इच्छा असते. हे एकूण तुम्हाला ही आनंद होईल की, भारतात अशा काही ट्रेन आहेत ज्या तुम्हाला परदेशात घेऊन जातात. तुम्हालाही ट्रेनने परदेशात जाण्याची इच्छा असेल तर तुमच्याजवळ पासपोर्ट असायला हवा. प्रवासाचा परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. भारतातून पाकिस्तानात जाण्यासाठी समझौता एक्सप्रेस आहे. पण, ही ट्रेन आता ऑपरेट केली जात नाही. थार एक्सप्रेस लिंक ट्रेन ही भारतातील जोधपूर ते पाकिस्तानमधील कराची पर्यंत धावते. मैत्री एक्सप्रेस ही कोलकत्ता ते ढाका दरम्यान धावते. मैत्री एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी तिकीट कोलकत्ता रेल्वे स्थानकावर ऑफलाईन खरेदी केले जातात. बंधन एक्सप्रेस भारतात कोलकत्तापर्यंत आणि बांगलादेश ते खुलनामध्ये दर आठवड्याला धावते. बंधन एक्सप्रेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2017 मध्ये सुरु करण्यात आली.