मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पाच गोष्टी आवश्यक आहेत. अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात साडेचार किलो मीटर जाडीत वाहणारे समुद्री वारे हे मान्सूनसाठी महत्वाचे केरळच्या दिशेने जमिनीच्या समांतर ताशी 30 किलो मीटरने वाहणारे समुद्री वारे आग्नेय अरबी समुद्रात आणि केरळ किनारपट्टी समोरील अलोट ढगाची दाटी संध्याकाळी अरबी समुद्रातून पाण्याच्या पृष्ठभागवरुन प्रति चौरस मिटर क्षेत्रफळावरुन 190 व्याट्स वेगाने उत्सर्जित होऊन बाहेर फेकणारी लंबलहरी उष्णताऊर्जा केरळमधील विखुरलेल्या 14 वर्षामापी केंद्रापैकी 10 केंद्रावर अडीच मिमी किंवा त्याहूनअधिक पावसाची झालेली नोंद यावरुन मान्सूनचे आगमन झाल्याचे ठरवले जाते. पाच गोष्टींची पूर्तता होत असल्यास मान्सून आल्याचे निश्चित केले जाते मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक ती स्थिती निर्माण होणं गरजेचं केरळमधील 14 वर्षामापी केंद्रापैकी 10 केंद्रावर अडीच मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होणं गरजेचं