प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.



सिद्धू मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मुसा गावात झाला.



एका पंजाबी कुटुंबात सिद्धू मुसेवाला जन्माला आले होते.



सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते.



सिद्धू मुसेवाला यांनी कॉलेजमध्ये असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन गाण्यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.



कॉलेजपासूनच सिद्धू मुसेवालाच्या गाण्याची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.



सिद्धू मुसेवाला यांनी लुधियानाच्या गुरू नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.



फायरिंग रेंजवर AK-47 बंदुकीने गोळीबार करताना सिद्धू मुसेवाला स्पॉट झाले होते.



सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे.



'लायसेन्स' असे त्याच्या पहिल्या गाण्याचे नाव होते.



हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली.