शेंगदाण्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. शेंगदाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.



हे पोषक घटक तुमच्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. शेंगदाण्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, लोह आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटकांचा समावेश असतो.



याबरोबरच शेंगदाण्यामध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपले स्नायू निरोगी राहतात. पण काही लोकांनी भिजवलेले शेंगदाणे खाऊ नयेत. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.



संधिवात असलेले रूग्ण : ज्या लोकांना संधिवाताची समस्या आहे. अशा लोकांनी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन करू नये. यामुळे तुमच्या शरीराला वेदना होऊ शकतात.



शेंगदाण्यामध्ये लेक्टिन नावाचे तत्व असते, ज्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.



कावीळ आणि यकृत नुकसान : भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील अफलाटॉक्सिन वाढते. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि नंतर रुग्णाला भूक कमी लागते.



जर तुमचे यकृत कमजोर असेल किंवा तुम्हाला यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर भिजवलेले शेंगदाणे खाणे टाळा. त्यामुळे तुम्हाला कावीळही होऊ शकते.



पोटाशी संबंधित समस्या असल्यास : ज्या व्यक्तींना पोटाशी संबंधित समस्या आहेत अशा व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन करू नये.



बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी समस्या असल्यास भिजवलेले शेंगदाणे खाणे टाळावे. यामुळे नुकसान होऊ शकते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.