सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.



श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील प्राचीन कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव आयोजित केला होता.



सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.



11 हजार पणत्या, दिवे लावून श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर तेजोमय करण्यात आला.



कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.



कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.



या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांनी देखील हा दीपोत्सव डोळ्यातील दीप प्रज्वलित करण्याचा आनंद लुटला.



दिवाळी पाडवा आणि त्याच दिवशी भाऊबीज असून देखील दीपोत्सव सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी केली होती.



कुणकेश्वर मंदिर परिसरात पालखीसह अनेक धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले.



Thanks for Reading. UP NEXT

आंबोलीत पांढऱ्याशुभ्र फुलांनी पठार बहरले

View next story