वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. चपाती सोडून भाताचा समावेश अनेक लोक वेट लॉस डाएटमध्ये करतात.



ब्राऊन आणि रेड राइस हे भाताचे दोन प्रकार आहेत जे व्हाइट राइस ऐवजी तुम्ही खाऊ शकता.



ब्राऊन राइसमध्ये जर्म आणि ब्रेन हे घटक असतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर व्हाइट राइसऐवजी तुम्ही ब्राऊन राइसचा समावेश डाएटमध्ये करू शकता.



हा तांदूळ आरोग्यासाठी चांगला आहे. ब्राऊन राइसमध्ये असणाऱ्या रंगद्रव्यांमुळे (pigments) या तांदळाला तपकिरी रंग असतो.



जर तांदळामधील रंगद्रव्यांचे प्रमाण वाढले तर या तांदळाचा रंग लाल, काळ किंवा जांभरा होतो.



त्यामुळे रेड राइस हा बाऊन राइसचा एक प्रकार आहे, असं म्हणता येईल.



जर तुम्हाला वेट लॉस डाएटसाठी ब्राऊन किंवा रेड राइसमधील एकाची निवड करत असाल तर तुम्ही दोन्ही राइसमधील कोणत्याही राइसचा समावेश डाएटमध्ये करू शकता.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.