'ब्लॅक ब्यूटी'; साराचा रॉयल लूक बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच साराने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. 'Black and white' लूकमध्ये सारा या फोटोंमध्ये दिसत आहे. “Black and white, severally incomplete and at the same time completely several.” असं कॅप्शन साराने या फोटोंना दिले. साराचा अतरंगी रे 24 डिसेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धुनष हे देखील 'अतरंगी रे' चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अतरंगी रे या चित्रपटातील 'चका चक' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.