मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज अक्रोड खावेत. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण बनवतो आणि निरोगी ठेवतो. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. ग्रीन टीमध्ये असणारी पोषक तत्वे तुमची बौधिक क्षमता वाढवण्यास मदत करतात. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीनसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवतात. कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे चिंता, तणाव दूर होतो. संत्र्यात मानसिक घट रोखण्यासाठी व्हिटॅमिन सी हा एक महत्वाचा घटक आहे. ब्लूबेरी मेंदूच्या विकासास मदत करतात. त्याचबरोबर सेंट्रल नर्व्हस सिस्टमचे आरोग्य देखील राखते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.