नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक काही प्रमाणात वाढली असून रोज 12 ते 13 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत.



मात्र सामान्यांना परवडणाऱ्या आंब्यासाठी एप्रिल महिन्यात वाट पाहावी लागणार आहे.



यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे.



फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती.



मात्र अवकाळी पाऊस आणि अति थंडीमुळे आंबे गळून पडल्याने आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.



आता काही प्रमाणात आवक वाढली असली तरी आंब्याचे दर मात्र पेटीमागे 2 हजार ते 5 हजारांपर्यंत आहेत.



20 एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे.



सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून



पुढील महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरु होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.