तुम्ही दिवसभर जे ड्रिंक्स पितात त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो



हे पेय तुमचे वजन कमी करण्यात आणि वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात



आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. आले हृदयासाठीही खूप चांगले आहे. आल्याचा चहा रोज प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते आणि वजनही कमी होते.



नियमितपणे नारळाचे पाणी प्यायल्याने तुमचे वजन देखील कमी होऊ शकते. पाण्यात कॅलरीज नगण्य असतात. नारळ पाणी प्यायल्याने तुमचे इन्सुलिन सुधारते आणि कोलेस्ट्रॉलही कमी होते.



ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कॉफीमध्ये कॅफीन असते जे ऊर्जा सेवन कमी करते आणि चयापचय वाढवते.



रोज ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. रोज सकाळी चहा ऐवजी ग्रीन टी प्यायल्यास तुमचे वजन सहज कमी होऊ लागते.



वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रोज लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी लिंबू पाणी जरूर प्या. गरम पाण्यात लिंबू घालून ते प्या.



अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे अनेक फायदे आहेत. एक ग्लास पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर टाकून प्यायल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. तुम्ही जास्त खाणे टाळता आणि हळूहळू तुमचे वजनही कमी होऊ लागते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.