अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
आज महाशिवरात्रीनिमित्ताने मौनीने शिवभक्तीत लीन असतानाचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री मौनी रॉयने ‘देवो कें देव महादेव’ हा लोकप्रिय मालिकेत ‘माता सती’ची भूमिका साकारली होती.
‘सती’च्या भूमिकेने मौनी रॉयला छोट्या पडद्यावर एक वेगळी ओळख मिळाली होती.
भगवान महादेवाची भक्त असणारी मौनी नेहमीच शंकराची पूजा-अर्चना करताना दिसते.
मौनी रॉयने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महादेवाची पूजा करताना दिसली आहे.
मौनीने आदियोगी सेंटरलाही भेट दिली होती. या दरम्यान तिने भगवान शंकराच्या भव्य मूर्तीसमोर छान फोटो पोज दिली होती.मौनी नेहमीच शिवभक्तीत रमताना दिसली आहे. (PC : @ imouniroy/IG)