महाशिवरात्री निमित्त देशभर आणि जगभरात आज शंभू महादेवाचा उत्सव साजरा होत असताना वेळापूर येथील पुरातन अशा अर्धनारी नटेश्वर मंदिरात देखील आज हजारो भाविक येथील महादेवाच्या खास रूपाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत .
पांडवकालीन असलेल्या या पुरातन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारी महादेवाची अनोखी पिंड आहे .
या पुरातन मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीची महादेवाची पिंड असून येथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्याने नटविलेले अर्धनारी नटेश्वर आहेत
म्हणजेच अर्धे शंकर आणि अर्धी पार्वती यांच्या मूर्ती पिंडीच्या ठिकाणी पाहायला मिळतात
अशा पद्धतीची मूर्ती जगात इतरत्र कोठेही आढळत नसल्याने या मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे
प्रत्येक मंदिरात प्रवेश करताना वरील बाजूस गणेशाची छोटी मूर्ती असते पण या मंदिरात गणेशाच्या ठिकाणी गजांतलक्ष्मी ची मूर्ती आहे
सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून मिळत असणाऱ्या शिलालेखावरून बाराव्या शतकात यादव राजे रामदेवराय यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे
आज महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असून हजारो भाविक या महादेवाच्या अनोख्या रूपाच्या दर्शनासाठी येत असतात
आज शिवरात्रि निमित्त अर्धनारी नटेश्वराला फुले , पाने आणि द्राक्ष व सफरचंदाची सजावट केली आहे