जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर जेवणात ताक प्या. ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट्स आणि लैक्टोज असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही साधे किंवा मसाला ताक जेवणासोबत पिऊ शकता.
दुधी भोपळा देखील वजन कमी करण्याचे काम करते. दुधी भोपळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दुधी भोपळा खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक मिळते.
बदामामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक कमी लागते. बदाम खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. मात्र, उन्हाळ्यात बदाम भिजवून खावे.
उन्हाळ्यात लिंबाचा वापर जास्त करावा. उष्णतेपासून वाचण्यासाठी दररोज लिंबू पाणी प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजनही कमी होते.
लिंबूमध्ये थायामिन, नियासिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-6 आणि फोलेट सारखी जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे वजन कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.