नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द फेम गेम'या वेबसिरीजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माधुरीला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. माधुरीकडे Mercedes Maybach S560 ही कार आहे. या कारची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. माधुरीकडे जर्मन लक्झरी कार मर्सिडीज एस क्लास 450 आहे. माधुरीच्या सर्वात महागड्या कारमध्ये रेंज रोव्हर वोगच्या कारचाही समावेश आहे. इतकंच नाही तर, मर्सिडीज GLS 350D सुद्धा माधुरीच्या लक्झरी कारच्या ताफ्यात सामील आहे. याशिवाय माधुरीकडे Skoda Octavia देखील आहे. माधुरीचे पती श्रीराम नेने हेदेखील तितकेच कारचे शौकीन आहेत.