फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.



हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.



त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता.



त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून 25 मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.



याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.



फडणवीस म्हणाले, 'माझ्या माहितीचा स्रोत विचारलं जाऊ शकत नाही



मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन,



असं ते म्हणाले. राज्य सरकार आणि पोलीस यांना उत्तर सुचत नाहीये त्यामुळे मला नोटीस पाठवली गेली आहे, असंही ते म्हणाले.