देशभरात वातावरणात गारवा पाहायला मिळतोय. जम्मू-काश्मीर पासून राजस्थान पर्यंत थंडीचा जोर वाढला आहे. बिहारच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालसाठी 11 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशा , छत्तीसगड , झारखंड आणि पश्चिम बंगाल मध्ये ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने पूर्व भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, गुजरात या भागात थंड वारे वाहत असून, त्यामुळे तापमानात घट झाली आहे.