लवकरच येणार ओमायक्रॉनवरील लस! मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, फायझर आधीच कोविड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. जगभरातील सरकार त्यांच्या देशात कोरोनाच्या संसर्गाशी लढा देत आहेत. ज्यामध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे वाढत्या रुग्णांचाही समावेश आहे. बोएर्ला यांनी सांगितले की, मार्चपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) वर लस तयार होईल. या लसीची गरज पडेल की नाही, तिचा वापर होईल की नाही हे माहीत नाही, पण तरीही आपण ही लस तयार करत आहोत बोएर्ला म्हणाले की, सध्याच्या कोविड-19 विरूद्ध संरक्षण करण्यासाठी दोन लसींचे डोस आणि बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनच्या आरोग्यावरील गंभीर परिणामांपासून संरक्षण मिळाले आहे.